बुलडाण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे प्रवासी बसला भीषण अपघात (Buldhana Bus Accident) झाल्याची घटना घडली आहे. पैनगंगा नदीच्या पुलावरुन बस खाली कोसळून हा मोठा अपघात झाला आहे. ही बस पुण्याला जात होती.
या अपघातात बसमधील एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तर 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताचा तपास बुलडाणा पोलिसांकडून करण्यात येत आहे.