मुंबईकडून पुण्यामार्गे बंगळुरू येथे जाणारी खासगी प्रवासी बस चांदणी चौक येथे रस्त्यावरून कोसळून भीषण अपघात झाला आहे. या घटनेत आठ ते दहा प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात शनिवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडला. ही बस शर्मा ट्रॅव्हल्सची होती. बावधन येथे मुख्य रस्त्यावरुन सेवा रस्त्यावर जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून बस 15 ते 20 फूट खाली कोसळली.
या बसमध्ये एकूण 35 प्रवासी प्रवास करत होते. जखमींना तातडीनं उपचारासाठी कोथरुड परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.या अपघातामुळे चौंदणी चौक परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.