भीषण अपघात; साखरपुड्यासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली

WhatsApp Group

नवी दिल्ली – शनिवारी रात्री उशिरा साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी तिरुपतीला निघालेली एक प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीमध्ये कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यामधील धर्मावरमशी येथे घडली आहे. जिथे लग्नाआधीच्या साखरपुड्यासाठी शनिवारी सुमारे 50 लोक बसने तिरुपतीला जाण्यास निघाले होते. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे.

तिरुपतीजवळील चित्तूर जिल्ह्यातीमधील भाकरपेट भागात चालकाचा ताबा सुटल्यामुळे ही बस सुमारे 100 फूट खोल दरीमध्ये कोसळली. या झालेल्या भीषण अपघातात 40 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे, तर यात अनेक लहान मुलांचाही समावेश आहे. याशिवाय अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना तिरुपतीच्या रूया सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक लोकांचे असे म्हणणं आहे की घटनास्थळी माणसांच्या मांसाचे तुकडेही पडलेले दिसत होते. एका वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहीती सांगण्यात येतं आहे.