क्रिकेटच्या मैदानात अचानक घुसला बैल खेळाडूंची उडाली तारांबळ, पहा व्हिडिओ

WhatsApp Group

क्रिकेटच्या मैदानातून रंजक दृश्ये समोर येतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. जिथे क्रिकेटच्या मैदानात बैल घुसला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन संघांमध्ये सामना सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, अचानक दोन बैल मैदानात घुसतात. बैल मैदानाच्या मध्ये जातो त्यामुळे  तिथे एकच गोंधळ उडतो.

सोशल मीडिया युजर्सच्या प्रतिक्रिया 

या व्हायरल व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका वापरकर्त्याने फलंदाजाच्या धाडसाचे कौतुक केले, तर काहींनी सांगितले की, बैलाला क्रिकेट खेळायचे आहे आणि तो स्वत:ला रोखू शकत नाही. एका वापरकर्त्याने मजेशीरपणे म्हटले – अधिक सुरक्षिततेसाठी अतिरिक्त क्षेत्ररक्षक असावेत.

हा व्हिडीओ कुठचा आहे हे माहीत नसले तरी ते बघता असे वाटते की कुठल्यातरी गावात किंवा शहरात काही स्थानिक क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या गेल्या असाव्यात. ज्यामध्ये रस्त्याने चालत असताना अचानक बैल घुसला. रस्त्यावर बसूनही लोक मॅचचा आनंद लुटताना दिसतात. अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये साप आणि विषारी प्राण्यांचे व्हिडीओही समोर आले आहेत.