पाकिस्तानमध्ये (PSL) बॉम्बस्फोटाच्या बातम्या सतत चर्चेत असतात. इथे कधी शाळेत तर कधी मशिदीत बॉम्बस्फोट होतात. पण, यावेळी पाकिस्तान क्रिकेट संघाचे मैदानही या स्फोटांचे बळी ठरले आहे. पेशावर झल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यातील क्वेट्टा येथील टी-20 सामना रविवारी दुपारी काही काळासाठी रद्द करण्यात आला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बाबर आझम, सरफराज अहमद आणि शाहीन आफ्रिदी आणि इतर खेळाडूंवर दगडफेक करताना दिसत आहेत.
क्वेट्टा येथे पेशावर झाल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स (PSL) यांच्यात टी-20 सामना खेळला जात होता. यादरम्यान मैदानाबाहेर बॉम्बस्फोट झाला. यानंतर मैदानात प्रेक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली. क्रिकेट पाकिस्तान या न्यूज पोर्टलने वृत्त दिले की, गर्दीच्या अशांततेमुळे सामना 30 मिनिटे थांबवण्यात आला. काही प्रेक्षकांनी मैदानावर दगडफेक केल्याने सामना रद्द करावा लागल्याची माहिती पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी ट्विटरवर दिली.
एका व्हिडिओमध्ये काही लोक स्टेडियमच्या आवारात दगडफेक करताना दिसत आहेत. कारण त्यांना सामना पाहण्याची संधी मिळालेली नाही. स्टेडियम चाहत्यांनी खचाखच भरले होते. मात्र, या घटनेत अनेक पाकिस्तानी खेळाडू जखमी झाल्याचीही बातमी आहे. ज्यामध्ये पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमचाही समावेश आहे.
افواہوں پر یقین نہ کریں۔ گراؤنڈ میں جگہ کی کمی کی وجہ سے پتھراؤ کی وجہ سے میچ روک دیا گیا ہے #PZvQG #QGvPZ @iamqadirkhawaja @iihtishamm pic.twitter.com/83QxKRicUl
— GC ShAhAb KhAn ( AfRiDi ) (@ShabiSpeaks) February 5, 2023
पाकिस्तान सुपर लीग (PSL) सीझन 8 च्या आधी, एका प्रदर्शनीय सामन्यात त्यांचे स्टार खेळाडू बाबर आझम, शाहिद आफ्रिदी आणि सरफराज खान यांना पाहण्यासाठी बुगटी स्टेडियमवर मोठ्या संख्येने लोक जमले होते. प्रदर्शनी सामन्यासाठी 13,000 हून अधिक तिकिटे विकली गेली, असे पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानस्थित जिओ न्यूजने सांगितले. स्टेडियम आणि आजूबाजूच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती, 4,000 हून अधिक पोलीस आणि फ्रंटियर कॉर्प्सचे जवान परिसराचे रक्षण करत होते.
Reports of multiple injuries in a bomb blast in highly secure area of Quetta near the Police headquarters and entrance of Quetta Cantonment. The city is under strict security due to a PSL cricket match. pic.twitter.com/lZcfn1VQRU
— The Balochistan Post – English (@TBPEnglish) February 5, 2023