निक्की यादव हत्या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. निक्कीच्या हत्येनंतर साहिलने दुसरे लग्न केले होते. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी साहिलने निक्कीसोबत नोएडा येथील मंदिरात लग्न केल्याचेही समोर आले आहे. या सगळ्या दरम्यान निक्की यादवच्या वडिलांचे म्हणणे आहे की, साहिलसोबतच्या तिच्या लग्नाबद्दल कुटुंबातील कोणत्याही सदस्याला माहिती नव्हती. म्हणजेच आता दोघांचे लग्नही एक गूढ बनले आहे. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये साहिलसह त्याच्या वडिलांचाही समावेश आहे. निक्कीचे कुटुंब हरियाणातील झज्जर येथे राहते.
मीडियाशी बोलताना निकीचे वडील सुनील यादव म्हणाले, ‘कुटुंबातील कोणालाही निक्की आणि साहिलच्या लग्नाबद्दल काहीही माहिती नव्हते. याबाबत आम्हाला खात्री नाही. निकीच्या हत्येत सहभागी असलेल्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे असं ते म्हणाले आहेत.
निक्की यादवच्या आईने या प्रकरणाबाबत माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या मुलीला न्याय मिळावा अशी विनंती केली आहे. या हत्येप्रकरणी आतापर्यंत साहिल गेहलोतच्या वडिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. निक्कीच्या आईचे म्हणणे आहे की, तिला साहिल आणि निकीची अजिबात कल्पना नव्हती. ते लोक नजफगडमध्ये जवळपास 9 वर्षांपासून राहतात. आपल्याला निक्की आणि साहिल बद्दल माहिती असते तर आज हे घडले नसते. असं त्या म्हणाल्या.