अहमदनगरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मोठा राडा

WhatsApp Group

Gautami Patil: सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. दरम्यान आता अहमदनगरमध्ये  गौतमीच्या कार्यक्रमात दगडफेकीची घटना घडली आहे.  नवनागापूरच्या सरपंचाच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ही घटना घडली 

गौतमी पाटील हे इंस्टाग्रामवरील सर्वात लोकप्रिय नावांपैकी एक आहे. तिच्या लावणी नृत्याने प्रेक्षकांना खरोखरच वेड लावले आहे. तिची लावणी पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी जमते. मात्र गौतमी पाटीलच्या लावणी नृत्याने मोठा वाद निर्माण केला आहे. तिच्या लावणी नृत्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. तिचा डान्स आणि हावभाव सर्वच अश्लील असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

कोण आहे गौतमी पाटील?

गौतमी पाटील लावणी नृत्य ही मूळची कोल्हापूरची आहे. सध्या तिची लावणी नृत्यांगना म्हणून महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. पण आता ती तिच्या लावणी डान्समुळे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

एका शोमध्ये त्याने आक्षेपार्ह लावणी डान्स केला होता. या डान्सनंतर तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ती वादातही आली होती. या व्हायरल व्हिडिओनंतर अनेकांनी तिला तिच्या अश्लील डान्ससाठी ट्रोल करण्यास सुरुवात केली. तसेच अनेक मराठी युट्युबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान, तिच्या (गौतमी पाटील) लावणी नृत्याला महाराष्ट्रात विरोध झाला आहे, पण तरीही तिची क्रेझ कायम आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या लावणी नृत्याचे कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमाला तिच्या चाहत्यांची मोठी गर्दी होत आहे.

गौतमी पाटीलचे काही व्हिडिओ 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Gau (@off_gautami_patil_941)