पाकिस्तान संघाला मोठा धक्का, ‘या’ खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती

पाकिस्तानच्या एका खेळाडूने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र, हा खेळाडू फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहणार आहे.

WhatsApp Group

वर्ल्ड कप 2023 पासून पाकिस्तान क्रिकेटमध्ये गोंधळ सुरू आहे. कर्णधारापासून मुख्य निवडकर्त्यापर्यंत बदल करण्यात आले आहेत. यादरम्यान पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या एका स्टार खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या खेळाडूने यावर्षी पाकिस्तानसाठी शेवटचा सामना खेळला.

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे त्याची आठ वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आता संपली आहे. इमाद वसीमने ट्वीटरवर एका पोस्टद्वारे चाहत्यांना निवृत्तीची माहिती दिली.

निवृत्तीची घोषणा करताना, इमाद वसीमने सोशल मीडियावर सांगितले की, अलीकडच्या काळात मी माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल खूप विचार करत आहे आणि मी या निर्णयापर्यंत आलो आहे की आता माझ्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणे खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे. माझे कुटुंब आणि मित्रांचे आभार, ज्यांनी मला सर्वोच्च स्तरावर पोहोचण्यात मदत केली आहे. मी आता आंतरराष्ट्रीय स्तरापासून दूर राहून माझ्या खेळाच्या कारकिर्दीच्या पुढील टप्प्यावर लक्ष केंद्रित करण्यास उत्सुक आहे.

इमाद वसीमची आंतरराष्ट्रीय कारकीर्द: इमाद वसीमने पाकिस्तानसाठी 55 एकदिवसीय आणि 66 टी-20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने 4.89 च्या इकॉनॉमीने 44 विकेट घेतल्या आणि 986 धावा केल्या. त्याच वेळी, टी-20 मध्ये त्याने 65 विकेट घेतल्या आणि फलंदाज म्हणून 486 धावा केल्या.