पाकिस्तान क्रिकेटला मोठा धक्का, पीसीबीच्या माजी अध्यक्षांचं निधन

WhatsApp Group

Pakistan Cricket: आज 23 मार्च रोजी पाकिस्तान क्रिकेटला मोठा धक्का बसला. पीसीबीचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध मुत्सद्दी शहरयार खान यांचे निधन झाले. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये शोककळा पसरली आहे. शहरयार खानच्या मृत्यूला त्याच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिला आहे. शहरयार खान यांचे पाकिस्तानातील लाहोर येथे निधन झाले. शहरयार यांनी राष्ट्रीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक, पीसीबीचे दोन वेळा अध्यक्ष आणि परराष्ट्र व्यवहार सचिव म्हणूनही काम केले आहे.

शहरयार खान यांचा जन्म 29 मार्च 1934 रोजी लखनऊ, भारत येथे झाला होता. शहरयार खान यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण भारतातच घेतले. यानंतर भारताची फाळणी झाली आणि शहरयार खान पाकिस्तानात गेले. शहरयार खान यांनी कराचीमध्ये मुत्सद्दी म्हणून प्रतिष्ठित कारकीर्द सुरू केली. याशिवाय त्यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव म्हणून काम पाहिले. शहरयार खान हे क्रिकेटचा समृद्ध वारसा असलेल्या कुटुंबातून होते. ते माजी भारतीय कर्णधार नवाब मन्सूर अली खान पतौडी यांचे चुलत भाऊ होते.

वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले
मिळालेल्या माहितीनुसार, शहरयार खान यांची प्रकृती पहाटे चारच्या सुमारास अचानक बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. शहरयार खान यांनी वयाच्या 89 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. शहरयार खान यांच्या पश्चात पत्नी आणि 4 मुले आहेत.

पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी व्यक्त केला शोक 
शहरयार खान यांच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष मोहसिन चेअरमन यांनी ट्विट केले आणि लिहिले की, पीसीबीच्या वतीने मी माजी अध्यक्ष शहरयार खान यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक आणि दु:ख व्यक्त करतो. ते एक चांगले प्रशासक होते आणि त्यांनी अत्यंत समर्पणाने पाकिस्तान क्रिकेटची सेवा केली.