हृदयद्रावक! वर्गात पेपर लिहीत असताना 9 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

WhatsApp Group

पंढरपूरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे इयत्ता तिसरीमध्ये शिकत असलेल्या अनन्या अतुल भादुले या 9 वर्षीय मुलीचा शाळेत पेपर लिहीत असताना अचानक झटका आल्यामुळे जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षकांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सूरु होण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अनन्याला “ब्रेन हैम्रेज” असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. हेही वाचा – साराच्या नावाने चिडवताचं गिलने दिली मजेशीर प्रतिक्रिया, VIDEO झाला व्हायरल

पंढरपूरच्या अरिहंत इंग्लिश स्कूलममधून ही दुर्दैवी घटना समोर आली. गुरुवारी अनन्या सकाळी 8 वाजता परीक्षा देण्यासाठी शाळेत गेली होती. अनन्याने संपूर्ण पेपर सोडविला. पेपर सुटण्यास काही वेळ बाकी असताना अनन्याला अचानक झटका आला. तिचे हातपाय वाकडे झाले. तिची अवस्था पाहून शाळेतील शिक्षकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले मात्र, दुर्दैवाने काही उपयोग झाला नाही. हेही वाचा – iPhone Offer: फक्त 12,200 रुपयांमध्ये iPhone खरेदी करण्याची संधी!

अनन्याच्या निधनामुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण हसत-खेळत घरातून गेलेले मूल शाळेतून मेलेले परतले. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांसह पंढरपूरकरांवर शोककळा पसरली आहे. गावातील एका लहान मुलीच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.