मोदीजी! पेन्सिल खोडरबर महाग झाले आहे, पेन्सिल मागितली तर आई मारते मी काय करू?

WhatsApp Group

देशात बेरोजगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. त्यातच महागाई वाढतेय. आणि हे कमी होतं म्हणून की काय केंद्र सरकारनं रोजच्या वापरातील वस्तूंवर टॅक्स देखील आता वाढवला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून जात आहे. याचिच प्रचिती देणारं एक पत्र सध्या व्हायरल होत आहे. हे पत्र एका 6 वर्षांच्या चिमूकलीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे.

पेन्सिल मागितली तर आई मारते, कारण तुम्ही पेन्सिलची किंमत वाढवली आहे अशी तक्रार या चिमुकलीनं थेट पंतप्रधानांकडे केली आहे. माझ्या मॅगीच्या किमतीही वाढल्या आहेत. पेन्सिल मागितली तर आई मला मारते. मी काय करू? मुले माझी पेन्सिल चोरतात. असं पत्र या सहा वर्षांच्या चिमुकलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.

कृती दुबे असं या लहान मुलीचं नाव आहे. ती सुप्रभाश अकादमीत इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी आहे. मुलीने अत्यंत निरागसपणे आपली समस्या एका पत्रामध्ये लिहून पंतप्रधान मोदींकडे वाढत्या महागाईची तक्रार केली. हे पत्र सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.