
उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. हमीरपूर रथ येथील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनीचा पेन्सिलची शिस घशात अडकल्याने मृत्यू झाला आहे.
कोतवाली परिसरातील पहाडी वीर गावातील रहिवासी नंदकिशोर यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा अभिषेक (12), मुली अंशिका (8) आणि अर्तिका (6) बुधवारी संध्याकाळी टेरेसवर अभ्यास करत होते. अभ्यास करत असताना अर्तिका तोंडात शार्पनर धरून पेन्सिल सोलत होती. या दरम्यान पेन्सिलची शिस घशात अडकल्याने तिचा श्वास थांबला, नातेवाईकांनी तिला सीएचसीमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ती गावातील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी होती. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास नातेवाईकांनी नकार दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले.