
उत्तर दिल्लीतील शास्त्री नगरमध्ये चार मजली इमारत कोसळल्याने राजधानी दिल्लीत खळबळ उडाली आहे. इमारत कोसळल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चार मजली इमारत जमीनदोस्त झाली आहे. दिल्ली महानगरपालिकेने (MCD) या इमारतीला आधीच धोकादायक घोषित केले होते. अपघातानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आजूबाजूची घरे रिकामी करण्यात आली आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. एमसीडीचे कर्मचारीही घटनास्थळी आहेत. बांधकामाधीन इमारत कोसळल्याचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिल्लीत दरवर्षी जीर्ण इमारती कोसळण्याच्या घटना घडतात. प्रशासन वेळोवेळी मोहीम राबवून लोकांना सतर्क करते. निष्काळजीपणाने लोक या इमारतींमध्ये राहायला येतात, असेही दिसून आले आहे.
#WATCH दिल्ली: उत्तर दिल्ली के शास्त्री नगर में चार मंजिला इमारत गिरी। पुलिस द्वारा वीडियो की पुष्टि की गई।
(वीडियो सोर्स: स्थानीय) pic.twitter.com/qI5PwkS1ED
— ANI_HindiNews (@AHindinews) December 5, 2022