चंदीगडमध्ये 33 वर्षीय बॉडी बिल्डरचा मृत्यू

WhatsApp Group

वर्कआउट करताना किंवा साधे काम करताना मृत्यूच्या घटना देशात वाढत आहेत. चंदीगडमधील दादू माजरा येथे पुन्हा असाच एक प्रकार समोर आला असून, बॉडीबिल्डिंग करताना एका 33 वर्षीय तरुण बॉडीबिल्डरचा मृत्यू झाला. राम राणा असे या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राम राणा त्याच्या मित्रांसोबत उभा राहून त्यांच्याशी बोलत होता. यादरम्यान त्याचे दोन्ही हात मागे वळले आणि तो जमिनीवर पडला. तो स्ट्रेच करत असावा असे त्याच्या मित्रांना वाटले. जमिनीवर पडल्यानंतर तो काहीच उत्तर देत नव्हता, तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला चंदीगडच्या सेक्टर 16, जीएमएच हॉस्पिटलमध्ये नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Gina Lollobrigida Passes Away: जगातील सर्वात सुंदर महिला जीना लोलोब्रिगिडा यांचे निधन

राम राणाच्या नातेवाइकांनी सांगितले की, त्याला कोणताही आजार नव्हता. तो निरोगी होता आणि रोज जिममध्ये व्यायाम करत असे. त्याला कोणत्याही प्रकारचे वाईट व्यसन नव्हते.