
मध्य प्रदेशातील रीवा येथे नाचत असताना बारातीला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना समोर आली आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने तो तरुण जमिनीवर पडला. घाईघाईत त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या घटनेमुळे विवाह सोहळ्यात शोककळा पसरली. उत्तर प्रदेशातील कानपूर येथून ही मिरवणूक रीवा येथे आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारची आहे. मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील कानपूर येथून ही मिरवणूक आली होती. लग्न समारंभासाठी बाराती बँडच्या तालावर नाचत होता. अचानक बाराती जमिनीवर पडला. लगेच त्याला संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र तोपर्यंत तरुणाचा मृत्यू झाला होता. या तरुणाचे घर एजी आवास विकास कॉलनी, हंसापुरम, कानपूर येथे असल्याचे सांगितले जात आहे.