संगमेश्वर तालुक्यातील रिया रमेश नावले या १७ वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नुकताच रियाने इंग्रजीचा पेपर दिलेला होता. रियाचे वडील रमेश हे कामानिमित्त मुंबईला असतात. बाकी घरातले कामावर गेल्यावर घरात एकटी असताना तिने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना समोर आल्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे पोलीस उपनिरीक्षक देशमुख ,कांबळे,सचिन कामेरकर ,अनिकेत चव्हाण ,खोदल आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. रियाने आत्महत्या का केली यामागील कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक नृत्य म्हणून नोंद करण्यात आलेली आहे.