
नांदगाव : नांदगाव तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनीचा प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यानंतर काढण्यात आलेल्या प्रभात फेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्यामुळे मृत्यू झाला आहे. पूजा दादासाहेब वाघ (वय 15) असं तिचं नाव असून ती इयत्ता नववीत शिकत होती. या घटनेमुळे परिसरात शोककlळा पसरली आहे.
तिला चक्कर आल्यानंतर तातडीने बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. पूजाची प्रकृती चिंताजनक असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जायभर यांनी तिला पुढील उपचारासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले असता वाटेतच तिचा मृत्यू झाला.