Shocking: YouTube Video पाहून 12 वर्षाच्या मुलाने बनवली दारू, नंतर पाजली मित्राला

WhatsApp Group

Trending News: केरळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका 12 वर्षांच्या मुलाने यूट्यूब ट्यूटोरियल्स (YouTube Tutorials) पाहून घरीच वाईनचा (Homemade Wine) ग्लास बनवला. ही वाईन पिल्याने त्याच्या एका मित्राला रुग्णालयात दाखल केल्यावर ही धक्कादायक बाब समोर आली.

काय आहे संपूर्ण प्रकरण

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षांच्या एका मुलाने यूट्यूब व्हिडिओवरून (YouTube Video) शिकून वाइन बनवली आणि ती एका मित्राला प्यायला दिली. हे प्यायल्यानंतर मित्राला अस्वस्थ वाटू लागले आणि उलट्या होऊ लागल्या, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. ही संपूर्ण घटना एका सरकारी शाळेत घडली, त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे.

पोलिसांनी मुलाची चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याने आई-वडिलांनी विकत घेतलेल्या द्राक्षांपासून वाईन बनवली होती. सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर जेव्हा वाइन तयार झाली तेव्हा त्याने ती बाटलीत भरली. यूट्यूब व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याने ही बाटली जमिनीखाली पुरली.

पोलिसांनी शाळेत आणलेल्या बाटलीतून वाइनचे नमुने (Sample Of Wine) गोळा केले आणि स्थानिक न्यायालयाच्या परवानगीने रासायनिक तपासणीसाठी (Chemical Examination) पाठवले जेणेकरून पुढील तपास करता येईल. पोलिसांनी सांगितले की, “या दारूमध्ये स्पिरिट किंवा इतर दारू मिसळली होती का, हे या तपासातून समजेल. मुलाने बनवलेल्या दारूमध्ये स्पिरीट किंवा अल्कोहोल (Alcohal) आढळून आल्यास, अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा (Juvenile Justice Act) दाखल करावा लागेल.