ठाण्यात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला ट्रकने चिरडले! जागीच मृत्यू, चालकाला अटक

0
WhatsApp Group

ठाण्यात एक वेदनादायक दुर्घटना घडली आहे. भरधाव ट्रकने दहा वर्षांच्या मुलीला चिरडले. त्यामुळे मुलीचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक घटनास्थळावरून फरार होऊ नये म्हणून लोकांनी चालकाला पकडल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 7 जून रोजी रात्री 8.30 च्या सुमारास घडली. शिळफाटा सर्कलजवळ 10 वर्षीय मुलगी रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकने मुलीला चिरडले. सध्या पोलिसांनी ट्रक जप्त करून चालकाला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.