ठाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे 10 वर्षीय मुलीच्या सावत्र बापाला अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी वडील 24 वर्षांचे असून पीडित मुलगी ही त्याच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी आहे. आरोपीने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला की 24 डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलीचे तीन जणांनी अपहरण केले आणि भिवंडी तालुक्यातील एका गावात तिच्यावर अत्याचार केला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.
मुलीचे अपहरण आणि अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या विविध कलमांखाली एफआयआर नोंदवला होता. मात्र, पोलिसांना त्या व्यक्तीच्या जबाबात विसंगती आढळून आली आणि चौकशीदरम्यान त्याने सत्य उघड केले.
अधिकाऱ्याने सांगितले की, “आरोपीने 10 वर्षांच्या मुलीवर तिची आई घरी नसताना तिच्या घरात अत्याचार केला. आरोपीला 2 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.