धक्कादायक! ९वीच्या विद्यार्थिनीला अ‍ॅसिड टाकून जाळले, मृतदेह तलावात दिला फेकून

WhatsApp Group

धनबादच्या जोरापोखर पोलीस स्टेशन परिसरामधून गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ९वीच्या वर्गातील मुलीचा मृतदेह मंगळवारी तलावामध्ये तरंगताना आढळून आला. मुलीचा चेहरा आणि शरीर अ‍ॅसिडने जाळल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं आहे. येथील न्यू किड्स गार्डन स्कूलमध्ये शिकणारी१५ वर्षीय विद्यार्थिनी गेल्या २६ मार्च रोजी दुपारी ४ वाजता घरातून शिकवणीसाठी बाहेर पडली आणि तेव्हापासून ती बेपत्ता होती.

कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. मंगळवारी तिचा मृतदेह सापडल्याची बातमी पसरल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुलीच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक लोकांनी पोलिस ठाण्यासमोर निदर्शने केली.

मुलीचे वडील सौदी अरेबियातील एका कंपनीमध्ये काम करतात. संपूर्ण कुटुंब जोरपोखर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरारी क्रमांक 7 परिसरामध्ये राहते. मंगळवारी विद्यार्थिनीचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुलीवर बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर अ‍ॅसिड टाकून तिची हत्या करण्यात आली. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच याबाबत काही सांगता येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.