VIDEO: पिकनिकसाठी गेलेल्या 9 तरुणांचा कालव्यात बुडून मृत्यू; आतापर्यंत 4 मृतदेह बाहेर, 5 जणांचा शोध सुरू

WhatsApp Group

गुरुवारी कासगंज येथे पिकनिकसाठी आलेल्या नऊ मित्रांचा आंघोळ करताना नदराई कालव्यात बुडून मृत्यू झाला. याची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिक लोकांच्या मदतीने चार मृतदेह बाहेर काढले. तर 5 मृतदेहांचा शोध सुरू आहे. तातारपूर हजारा कालव्यात ही घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच हजारा कालव्यावर मोठा जमाव जमला. प्रशासनाकडून बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तरुणांच्या शोधासाठी गोताखोरांचे पथक तैनात करण्यात आले आहे.

कासगंज डीएम सुधा वर्मा आणि एसपी अपर्णा रजत कौशिक यांनी स्वतः बचावकार्याची कमान घेतली आहे. सदरचे आमदार देवेंद्र सिंह राजपूतही घटनास्थळी पोहोचले आहेत. बुडालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी गोताखोर आणि पीएसी कर्मचारी सातत्याने प्रयत्न करत आहेत. एक मुलगा एटा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. बुडालेल्यांपैकी एकाचे नाव अभिषेक असल्याचे सांगण्यात येत आहे. इतर एटा नगरच्या नागला पोटा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.