लखनौच्या हजरतगंजमध्ये भीषण अपघात, घराची भिंत कोसळल्याने दोन मुलांसह 9 जणांचा मृत्यू

WhatsApp Group

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. हजरतगंज परिसरात भिंत कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दोन मुलांचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. यासोबतच मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. लखनौमध्ये कालपासून सतत पाऊस पडत आहे. भिंतीचा ढिगारा हटवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. सीएम योगी यांनी स्वत: डीएम आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या. पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत.

हजरतगंज परिसरात अनेक जुनी घरे आहेत. हे घर 100 वर्षे जुने सांगितले जात आहे. पावसामुळे घराची संपूर्ण भिंत कोसळली. ज्यामध्ये सुमारे 10 लोक गाडले गेले. या संपूर्ण परिसरात छोट्या-छोट्या गल्ल्या असून त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. कामाला गती देण्याचे आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

🪀INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा