अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या ‘या’ 8 नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

WhatsApp Group

मुंबई : विधानसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली.अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

शपथ घेणारे मंत्री

  • अजित पवार, उपमुख्यमंत्री
  • छगन भुजबळ, कॅबिनेट मंत्री
  • दिलीप वळसे पाटील
  • हसन मुश्रीफ
  • धनंजय मुंडे
  • धर्मराव बाबा अत्राम
  • आदिती तटकरे
  • संजय बनसोडे
  • अनिल पाटील

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.