Mahatama Gandhi Jayanti 2022 : 2 ऑक्टोबर 1869 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म पोरबंदर गुजरात येथे झाला. यंदा त्याची 153 वी जयंती आहे. मोहनदास करमचंद गांधी म्हणून जन्मलेले, ते एक वकील होते जे आफ्रिकेतील पीटरमॅरिट्झबर्ग येथे ट्रेनमधून बाहेर फेकल्यावर त्यांच्या हक्कांसाठी लढल्यानंतर प्रसिद्ध झाले. नंतर त्यांना ‘महात्मा’ असे नाव देण्यात आले, “महान आत्मा” आध्यात्मिक नेता आणि ‘बापू’. संयुक्त राष्ट्र महासभेने घोषित केल्यानुसार हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणूनही साजरा केला जातो.
आज महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आपण आपण त्यांचे प्रेरणादायी विचार जाणून घेणार आहोत…
1)चारित्र्याचा विकास हेच सर्वात मोठे शिक्षण.
2)ईश्वर म्हणजे सत्य, प्रेम, नीती, ईश्वर भीतीचा अभाव जीवनाचे आणि प्रकाशाचे साधन म्हणजे ईश्वर होय.
3)शरीर असेल तोपर्यंत त्याचा उपयोग केवळ सेवेसाठी करावा.
4)हा महार, तो ब्राम्हण असा उच्च नीच भाव निर्माण होत असेल तर त्या धर्माला मी धर्म मानणार नाही.
5)जोपर्यंत संबंध मानवजातीत ऎक्याच्या भावनेस महत्व दिले जात नाही, तोपर्यंत प्रार्थना, उपवास, जपतप निरर्थक आहेत.
6)सुधारणा म्हणजे ज्याच्यामुळे मनुष्य आपले कर्तव्य बजावित राहतो ते आचरण.
7)माणसाच्या ठिकाणी जे सत्य, सद्गुण असतात, त्यांना प्रकाशात आणणे हे शिक्षणाचे कार्य आहे.
8)जिज्ञासा असल्याशिवाय ज्ञान मिळणे शक्य नाही. जिज्ञासा ही ज्ञानाची पहिली पायरी होय.
9)धर्म म्हणजे ईश्वराकडे जाण्याच्या वाटा. माणसातील माणुसकी, मानवता, प्रगट करणारा तो खरा धर्म
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा