Car Accident: कार नदीपात्रात कोसळली, भीषण अपघातात ९ जणांचा बुडून मृत्यू

WhatsApp Group

रामनगर : जुलै महिना सुरू होताच देशात पावसाचा जोर वाढला आहे. महाराष्ट्र, उत्तराखंड, तामिळनाडू राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच उत्तराखंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यामध्ये नदीपात्रात कार कोसळून अपघात (Car Accident:) झाला आहे. या दुर्देवी घटनेमध्ये कारमधील 9 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास रामनगर येथील ढेला नदीपात्रात ही दुर्देवी घटना घडली.

या पघातामद्धे एका मुलीला वाचवण्यात यश आलं आहे. नदीत बुडालेल्या कारमधून शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सर्व 9 मृतदेह बाहेर काढले आहेत. अपघातग्रस्त कारही तासाभराच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आली. सर्व मृत पंजाबमधील असल्याचे समोर आलं आहे.

ढेला नदीच्या परिसरामध्ये रात्री उशिरा 2 वाजेपासून पाऊस पडत होता. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरले होते. त्याचवेळी काशीपूरहून रामनगरला जाताना नदीचा प्रवाह पाहून थांबलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, त्याने पुलावरून पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे कारचालकाला पूल पार न करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याचा सल्ला न ऐकता कारचालकाने कार थेट पुराच्या पाण्यात टाकली. मात्र त्यानंतर हा अपघात घडला.