
उद्धव ठाकरे यांच्या गटातील अनेक नेते, पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होतं आहेत. दरम्यान आता उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाने आणखी एक मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचा गड असलेल्या परभणी जिल्हयामधील 84 सरपंचांनी एकनाथ शिंदे यांच्यात गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटालाचं नव्हे संपूर्ण महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. परभणी जिल्ह्यामधून संतोष बांगर आणि शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे यांच्या पुढाकारानं परभणी जिल्ह्यातील तब्बल 84 सरपंचांनी शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.