नागपूर – जिल्ह्यातील कुही तालुक्यामधील किन्ही येथील भारत गॅस कंपनीचे मालक चिंधु आत्माराम ठवकर यांचे वडील आत्माराम मोतीराम ठवकर (८०) यांनी गॅस गोडाऊन असलेल्या शेताच्या एका बाजूला स्वतःच सरण रचून विधिवत पूजा-अर्चाना करत आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना घडली आहे 80 Year Old Man Suicide In Nagpur. ही घटना महाशिवरात्रीच्या दिवशी किन्ही गावाबाहेर असलेल्या त्यांच्याच शेतामध्ये घडल्याचं आज सकाळी उघडकीस आलं.
आत्माराम हे एक वारकरी होते. ते धार्मिक वृत्तीचे होते. ते नेहमी आजारी असायचे. परंतु मागील बऱ्याच काळापासून त्यांची प्रकृती ही उत्तम होती. तरीही अशाप्रकारे आत्महत्या करण्याचे काय कारण असू शकते, यासंदर्भात आता गावात चर्चांना उधाण आलं आहे. आत्महत्या केली त्याच दिवशी आत्माराम यांनी गावात मंडईनिमित्त सुरू असलेल्या झाडीपट्टीतील नाटकाचा आनंद घेतला होता.
पहाटे पाच वाजता आत्माराम हे शेताकडे गेले. शेतात असलेली लाकडं एकत्र करून सरण रचले आणि त्यावर सुकं गवत टाकलं. आत्माराम यांनी आत्महत्या करण्याआधी सरणाची पूजा केली असेल असा अंदाज व्यक्त केला जातं आहे. पूजा केल्याचा अंदाज व्यक्त करण्यामागील कारण म्हणजे सरणाजवळ दिवा पेटत होता. तसंच पानाचा विडा देखील ठेवलेला होता. या प्ररकरणामद्धे घरच्यांचे काही म्हणणे नाहीय त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.