नागपूरच्या रिसॉर्टमध्ये लग्नाच्या जेवणातून 80 जणांना विषबाधा

WhatsApp Group

महाराष्ट्रातील नागपुरात एका लग्न समारंभात शिळे अन्न खाल्ल्याने वरासह 80 जण आजारी पडले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
ही घटना 10 डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी वराचे व्यापारी वडील कैलाश बत्रा यांनी चोखर धानी रिसॉर्टच्या व्यवस्थापनाविरुद्ध कमलेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बत्रा म्हणाले की, कार्यक्रमात शिळे अन्न दिले गेले होते, ज्यामुळे दुर्गंधी येत होती आणि ते खाल्ल्यानंतर लोक आजारी पडत आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण ?

स्थानिक मीडियानुसार, कैलाश बत्रा यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी आणि रिसेप्शनसाठी 9 आणि 10 डिसेंबर रोजी नागपूरच्या अमरावती रोडवर असलेल्या चोखर धानी रिसॉर्टमध्ये राजस्थानी थीम बुक केली होती. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सुमारे 500 लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 10 डिसेंबर रोजी रात्री जेवण केल्यानंतर काही लोकांना पोटात दुखू लागले. दुपारी 2:30 नंतर लोकांची प्रकृती खालावली.

हेही वाचा – श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल

पोलिसांनी सांगितले की, पाहुण्यांनी रिसॉर्ट व्यवस्थापनाकडे जेवणाबाबत तक्रार केली होती, परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. पोलीस अधिकारी सांगतात की, दाखल झालेल्या सर्व रुग्णांचे वैद्यकीय अहवाल गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याआधारे रिसॉर्ट व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 2 आणि 3 डिसेंबर रोजी रिसॉर्टमध्ये जेवण केल्यानंतर 100 लोक आजारी पडल्याची नोंद आहे.