धक्कादायक घटना! पुण्यात 8 वर्षीय चिमुकल्याने घेतला गळफास

WhatsApp Group

पुणे जिल्ह्यातून (Pune district) एक अतिशय खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. आई कामात व्यस्त असताना आठ वर्षांच्या चिमुरडयाने आधी बाहुलीला फाशी दिली आणि त्यानंतर स्वत: देखील गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

एखाद्या कैद्याला फाशी देण्यापूर्वी चेहरा झाकतात अगदी तसाच त्याने बाहुलीच्या तोंडावर कपडा बांधला होता. बाहुली आपल्याला सोडून गेल्याचं समज झाल्यानंतर या मुलाने देखील स्वतःच्या गळ्याभोवती दोरी बांधून गळफास घेतला. या घटनेमध्ये या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना पिंपरीतील थेरगाव (Thergaon Pimpri Chinchwad) परिसरात घडली आहे.