८ महिन्यांच्या बाळासोबत मोलकरीणीने केलेलं हे कृत्य ऐकून अंगावर उभा राहिल काटा!

WhatsApp Group

गुजरात – गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या ८ महिन्यांच्या बाळाला संगोपनास ठेवलेल्या मोलकरीणीने बेदम मारहाण केल्यामुळे त्या मुलाला ब्रेन हॅमरेज झाले आहे. गुजरात Gujarat राज्यातील सूरत शहरात ही घटना घडली आहे.

गुजरातमधील सुरत जिल्ह्यात एका कुटुंबाने आपल्या 8 महिन्यांच्या बाळाच्या देखरेखेसाठी एक मोलकरीणी ठेवली होती. हे कुटुंब सुरतच्या रांदेर पालनपूर पाटिया येथे राहते.

मुलाचे पालक दोघेही नोकरदार आहेत. त्यामुळेच त्यांनी मुलाची काळजी घेण्यासाठी मोलकरीणीने  ठेवले होते. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे मुल रडत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिल्यानंतर या जोडप्याने मोलकरीणीवर शंका घेत त्यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावला.

या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील फुटेज पाहून पालंकाच्या अंगावर काटा उभा राहिला होता. मोलकरीणीने ८ महिन्यांच्या त्या बाळाला निर्दयीपणे मारहाण केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. फुटेजमध्ये ती मुलाचे डोके पलंगावर वारंवार आपटतानाही दिसत आहे. बाळाचे केस उचकटून त्याला निर्दयीपणे मारतानाही ती कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

त्या ८ महिन्यांच्या बाळाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याला ब्रेन हॅमरेज झाले आहे. पोलिसांनी त्या मोलकरीणीला ताब्यात घेत तिच्यावर मुलाच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोप ठेवण्यात आला आहे.

 

हेही वाचा 

24 तासांत 919 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवत लिसा स्पार्कने रचला विचित्र विक्रम

जगातील सर्वात उंच इमारतीवर चढली ‘ही’ महिला, धोकादायक स्टंट पाहून लोक झाले अवाक