National Herald Case : राहुल गांधींची ईडीकडून 8 तास चौकशी, उद्या पुन्हा बोलावलं!

WhatsApp Group

National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांची आज ईडीने तब्बल 8 तास चौकशी केली. त्यानंतर आता पुन्हा उद्या मंगळवारी राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. राहुल गांधी यांना पुन्हा एकदा चौकशीला बोलावण्यात आल्यामुळे काँग्रेसचे नेते संतप्त झाले आहे. त्यामुळे उद्याही निदर्शने करण्याची शक्यता आहे.

नॅशनल हेराल्डमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आज राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी झाली. दुपारी 12 वाजेपासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत अशी एकूण साडे आठ तास त्यांची ईडी चौकशी झाली. यामध्ये त्यांची पहिल्या सत्रात 3 तास आणि दुसऱ्या सत्रामध्ये साडे पाच तास चौकशी झाली आहे. मात्र आता पुन्हा उद्या मंगळवारीही ही राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. उद्या पुन्हा त्यांना चौकशीला हजर राहावे लागणार आहे.

दरम्यान, आज राहुल गांधी ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी जाणार हे कळताच देशभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेल्याचे पाहायला मिळाले. देशभरात दिल्लीसह मुंबई आणि राज्याच्याही इतर भागामध्ये काँग्रेसने आंदोलनं केली. तर ईडीच्या कार्यालयाबाहेरही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या धरल्याचे पाहायला मिळालं.