Cheetah is back : 70 वर्षानंतर देशात पुन्हा दिसणार चित्ते, नामिबियातून 8 चित्ते भारतात दाखल

WhatsApp Group

नामिबियाहून 8 चित्त्यांना घेऊन एक विशेष चार्टर्ड कार्गो फ्लाइट मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील भारतीय हवाई दलाच्या स्थानकावर उतरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडणार आहेत. कुनो पालपूर नॅशनल पार्क (KNP) चित्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. त्यांना खाण्यासाठी वन्य प्राण्यांनाही सोडण्यात आले आहे. याशिवाय स्थानिक लोकांनाही योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भारतात आणलेल्या चित्त्यांसमोर काही आव्हानं असतील. चित्त्यांना भारतातील वातावरणाशी जुळवून घ्यावं लागेल. चित्त्यांना 24 तास देखरेखीखाली ठेवण्यात येईल. त्यांना 12 किलोमीटरच्या विशेष अधिवासात विलगीकरणात म्हणजेच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येईल.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा