7th Pay Commission: या कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळीची भेट, पगारात 4 टक्क्यांनी होणार वाढ

WhatsApp Group

तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सरकारने देशातील 50 लाखांहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीएचा मसुदा तयार केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक 18 ऑक्टोबरला होणार आहे. ज्यामध्ये महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली जाईल. वाढीव भत्ता ऑक्टोबरच्या पगारात जोडला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच काही सांगता येईल. मात्र भत्त्यात वाढ करण्याचा मसुदा तयार करण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. फक्त घोषणा होणे बाकी आहे…

4 टक्के वाढ होईल

सध्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. भत्त्यात वाढ जुलै महिन्यात होणार होती. मात्र काही कारणांमुळे महागाई भत्ता वाढू शकला नाही. आता 18 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडी समितीच्या बैठकीत 4 टक्के भत्ता वाढीची घोषणा होणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. याआधी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. भत्ता किती वाढणार? आजच्या बैठकीत याची घोषणा होऊ शकते. Rohit Sharma: विश्वचषक 2023 दरम्यान रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय

केंद्र सरकारने सप्टेंबर 2022 मध्ये महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली होती. मात्र यावेळी आर्थिक वर्ष 2023 चा भत्ता अद्याप वाढवण्यात आलेला नाही. सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महागाई भत्ता हा एक प्रकारचा भत्ता आहे जो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्यांच्या मूळ पगाराच्या वर दिला जातो. या आर्थिक वर्षाचा भत्ता दिवाळीपूर्वी खात्यात जमा होईल. Poonam Pandeyचे हे फोटो बघून उडले तुमची झोप, सोशल मीडियावर व्हायरल