कोल्हापूरकराचा नादच खुळा…ऑनलाईन गेममधून मिळाले 1 कोटी

WhatsApp Group

कोल्हापूर येथील सातवीतल्या एका विद्यार्थ्याला 1 कोटी रुपये मिळाले आहेत. भारत-न्यूझीलंड तिसऱ्या वनडे सामन्यामध्ये या मुलाने ऑनलाईन गेममध्ये सहभाग नोंदवला. ऑनलाईन गेममधून त्याने तब्बल 1 कोटी रुपये मिळवले आहेत. मुरुगड इथल्या सक्षम कुंभार या लहान मुलाने ही कामगिरी केली आहे.

या मुलांच्या टीममध्ये इशान किशन, रोहित शर्मा, विराट कोहली, डेवॉन कॉनवे, शुभमन गिल, ब्रेसवेल, हार्दिक पांड्या, डफी, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर आणि टिकनर यांना टीममध्ये निवडलं.