
Coronavirus New Cases : देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिसत आहे. गेल्या 24 तासांत 7240 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 32 हजार 490 वर पोहोचली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 40 टक्क्यांनी वाढत आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत देशात 7240 नवीन रुग्ण आढळले असून, सक्रिय रुग्णांची संख्या 32 हजार 490 झाली आहे. त्यापैकी 2,701 रुग्ण केवळ महाराष्ट्रात आढळून आले आहेत. ही गेल्या चार महिन्यांतील सर्वात मोठी वाढ आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली होती, मात्र बुधवारी तब्बल 93 दिवसांनंतर एका दिवसांत देशात पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. आज हा आकडा सात हजारांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरणार की, काय? अशी भिती व्यक्त केली जात आहे.