
गोरखपूरमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. यूपीच्या गोरखपूरमधील 70 वर्षीय सासरच्याने आपल्या 28 वर्षीय विधवा सुनेसोबत सात आयुष्यं राहण्याची शपथ घेतली आहे. या अनोख्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. गोरखपूर आणि आसपासच्या जिल्ह्यातही हा विवाह चर्चेचा विषय राहिला आहे. या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बरहालगंज पोलिस स्टेशनमध्ये वॉचमन म्हणून काम करणाऱ्या कैलाश यादव यांनी 12 वर्षांपूर्वी पत्नी गमावली होती आणि काही काळानंतर त्यांच्या तिसऱ्या मुलाचाही मृत्यू झाला होता.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गोरखपूरच्या बधलगंज पोलीस स्टेशन हद्दीतील छपिया उमराव गावातील रहिवासी कैलाश यादव (70 वर्ष) यांचा मुलगा अनेक वर्षांपूर्वी मरण पावला होता. त्यांच्या पत्नीचेही 12 वर्षांपूर्वी निधन झाले होते. बरहालगंज पोलिस स्टेशनचे चौकीदार कैलाश यादव हे त्यांची विधवा सून 28 वर्षीय पूजा हिच्यासोबत राहत होते. कैलास यांच्या 4 मुलांपैकी तिसऱ्या मुलाची पत्नी पूजा ही विधवा झाल्यापासून एकटीच राहत होती.
कैलासने त्याची विधवा सून पूजा हिचे दुसरे लग्न करून दिले होते, पण हे लग्न फार काळ टिकले नाही. यानंतर ती घरी परतली आणि कैलास यांच्या घरी राहू लागली. कैलसने गावात कोणालाही न सांगता पूजाशी गुपचूप लग्न केले. फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांना याची माहिती मिळाली. या विवाहाबाबत परिसरात चर्चा सुरू आहे.