Mahavir Jayanti 2023: महावीर जयंतीनिमित्त वाचा भगवान महावीरांचे 7 अनमोल विचार

WhatsApp Group

मंगळवार, 4 एप्रिल रोजी महावीर जयंती आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाला महावीर जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर होते. जैन धर्माच्या प्राचीन मान्यतेनुसार भगवान महावीरांनी 12 वर्षे कठोर तपश्चर्या केली होती, त्यामुळे त्यांना इंद्रियांवर विजय प्राप्त झाला. दिक्षा घेतल्यानंतर भगवान महावीरांनी दिगंबराचा स्वीकार केला. दिगंबर लोक आकाशाला आपले वस्त्र मानतात, म्हणूनच ते कपडे घालत नाहीत. भगवान महावीरांनी समाजहितासाठी खूप काम केले. महावीर जयंतीनिमित्त त्यांचे काही अनमोल शब्द वाचा.

परमात्म्याची शक्ती अमर्याद आहे,
त्याच्या मानाने आपली
श्रद्धा अत्यंत अल्प असते.

भीतीने घाबरून जावू नये
भयभीत मनुष्या जवळ
भये शीघ्रतेने येत असतात.

मनुष्य प्रयत्न वादाने
सर्व काही करू शकतो.

शांतीने रागाला, नम्रतेने अभिमानाला,

सरलतेने मायेला तसेच समाधानाने
लोभिपनाला जिंकले पाहिजे.

सेवाधर्म हा ईतका कठीण आहे कि,
योगी लोक देखील
तेथ पर्यंत पोहचू शकत नाही.

हजार गुण प्राप्त करणे सोपे आहे
पण एक दोष दूर करणे फार कठीण आहे.

नम्रता म्हणजे
ज्ञानाचा मापदंड आहे.