
प्रेम हे नात्याचं गाभा असलं तरीही शारीरिक जवळीक देखील तितकीच महत्त्वाची आहे. अनेकदा असं दिसून येतं की दोघांमध्ये प्रेम असतं, परंतु तरीही एक जोडीदार दुसऱ्याच्या वागणुकीमुळे किंवा शारीरिक नात्याच्या अनुभवामुळे असमाधानी राहतो. विशेषतः महिलांमध्ये ही भावना अनेकदा दिसून येते. पुरुषांना याची जाणीवही होत नाही की संभोगादरम्यान किंवा त्याआधी काही सवयी, वागणूक किंवा चुकीची पद्धत त्यांच्या नात्याला हानी पोहोचवू शकते.
चला तर मग जाणून घेऊया अशाच 7 चुकांची यादी, ज्या तुमच्या प्रेमसंबंधात दुरावा निर्माण करू शकतात:
1. फक्त स्वतःच्या समाधानावर लक्ष केंद्रीत करणे
अनेक पुरुष संभोगात केवळ स्वतःच्या गरजा आणि समाधान यावर लक्ष केंद्रित करतात. स्त्रीच्या भावनिक आणि शारीरिक समाधानाकडे दुर्लक्ष केल्यास, तिला उपेक्षित वाटू शकते. संबंध ‘एकतर्फी’ वाटल्यास, ती हळूहळू अंतर निर्माण करू शकते.
2. पूर्वसंग (Foreplay) ला महत्व न देणे
पूर्वसंग हे संभोगाचा महत्त्वाचा भाग आहे. महिला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्ण तयार व्हाव्यात यासाठी हळुवार स्पर्श, आलिंगन, चुंबन यांना महत्त्व आहे. हे टाळल्यास तिला ‘mechanical’ अनुभव येतो.
3. संवादाचा अभाव
शारीरिक संबंध फक्त शरीराचं नव्हे, तर संवादाचंही माध्यम असतो. संभोगानंतर किंवा आधी तिच्या भावना, अपेक्षा, अडचणी जाणून घेणे गरजेचे असते. ‘ती काही बोलत नाही, म्हणजे सगळं ठीक आहे’ असं समजणं ही मोठी चूक ठरू शकते.
4. सतत घाई करणे
ती कितीही प्रेम करत असली तरी प्रत्येक वेळेला जलद किंवा घाईगडबडीने संभोग करणे तिला त्रासदायक वाटू शकते. शरीराला आणि मनाला वेळ दिला नाही, तर तिचा अनुभव नकारात्मक होतो.
5. स्वच्छतेकडे दुर्लक्ष
शारीरिक स्वच्छता, तोंडाचा वास, अंगाचा घाम किंवा अस्वच्छ अंथरूण – या गोष्टी स्त्रियांना त्रास देतात. जरी त्या बोलून दाखवत नसल्या, तरी या गोष्टीमुळे तिची इच्छा मावळते.
6. अवास्तव पोर्नफिल्मी अपेक्षा ठेवणे
अनेक पुरुष पोर्न फिल्म्स पाहून काही अवास्तव आणि कृत्रिम अपेक्षा ठेवतात. हे प्रकार खऱ्या नात्यात शक्यच नसतात. ही तुलना किंवा जबरदस्तीमुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते.
7. संवेदनशीलतेचा अभाव
स्त्रीसाठी प्रत्येक स्पर्श, नजर, शब्द यामध्ये भावना असते. केवळ लैंगिक समाधानाच्या उद्देशाने जर संबंध ठेवला जात असेल, तर ती आपली ‘भावनिक गरज’ अपूर्ण मानू लागते. तिच्या गरजा समजून घेणे आणि त्या पूर्ण करणे हे प्रेमाचं खरे रूप आहे.
ती तुमच्यावर प्रेम करते, हे खरं आहे. पण त्या प्रेमात जर ती असमाधानी वाटत असेल, तर तुमच्या वागणुकीकडे एक कटाक्ष टाका. संभोग म्हणजे केवळ शारीरिक जवळीक नाही, तर त्यात भावनिक एकोपाही महत्त्वाचा असतो. संवाद, समजून घेणे, आणि दोघांचीही समसमान गरज लक्षात घेणे हे नातं टिकवण्यासाठी अत्यावश्यक आहे.