68th National Film Awards Winnersची आज होणार घोषणा, इथे पाहू शकता LIVE

WhatsApp Group

आज म्हणजेच 22 जुलै रोजी दुपारी 4 वाजल्यापासून एक मेगा इव्हेंट सुरू होणार आहे. हा असा कोणताही कार्यक्रम नसून 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचा (68th National Film Awards) कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक चित्रपट आणि कलाकारांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये कलाकारांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पीआयबी इंडियाने याबाबतची माहिती दिली आहे. तेसच याचे लाईव्ह प्रसारण तुम्ही यूट्यूब आणि फेसबुकवर ही पाहू शकतात.

यंदा पुरस्कारांच्या शर्यातील अनेक चित्रपटांची नावे चर्चेत आहेत. यात विकी कौशलचा ‘सरदार उधम सिंग’, सिद्धार्थ मल्होत्राचा ‘शेरशहा’, अजय देवगणचा ‘भुजः द प्राइड ऑफ इंडिया’ आणि विद्या बालनचा ‘शेरनी’ हे चित्रपट चर्चेत आहेत. या चित्रपटांशिवाय साऊथचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा: द राइज’चाही या चर्चेत समावेश आहे. या पुरस्कारांमध्ये अनेक श्रेणी असू शकतात, ज्याच्या आधारे कलाकारांना हे पुरस्कार देण्यात येतील.