उत्तर प्रदेशात 6,000 भोंगे खाली उतरवले

WhatsApp Group

सध्या उत्तर प्रदेशमध्ये बुलडोझरबाबत कडक कारवाई सुरू आहे. बुधवारी सकाळी सुप्रीम कोर्ट आणि उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशावरून प्रशासनाने उत्तर प्रदेश राज्यातील अनेक जिल्ह्यांतील धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले आहेत.

उत्तर प्रदेश राज्यातील एकूण 12 झोन आणि आयुक्तालयातील धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले 6,000 लाऊडस्पीकर आतापर्यंत काढण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर 29 हजार 674 धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरांसाठी आवाजाची श्रमता ठरवून देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी लाऊडस्पीकरबाबत सांगितले होते की, उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच राज्यातील सर्व धार्मिक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वापरता येतील. त्याचवेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, जर कोणी मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात लाऊडस्पीकर वापरताना आढळले तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. अखेर आता कठोर कारवाई करण्यात आली.