धक्कादायक घटना! जमिनीच्या वादातून माजी जिल्हा परिषद सदस्यासह 6 जणांची हत्या

0
WhatsApp Group

देवरिया : उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये जमिनीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून 6 जणांची हत्या झाल्याची बातमी आहे. ही हत्या धारदार शस्त्राने करण्यात आली आहे. हे प्रकरण फतेहपूर, रुद्रपूरच्या लेधान टोला गावातले आहे. या खळबळजनक घटनेने देवरिया हादरले आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त पोहोचला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे. सकाळी घराबाहेर बसलेल्या लोकांवर गोळ्या झाडून हे हत्याकांड घडवण्यात आले.

जमिनीच्या वादातून ही घटना घडली होती. ही खळबळजनक घटना सोमवारी सकाळी घडली. सोमवारी सकाळी अनेक राऊंड गोळीबार झाल्याचे गावातील लोक बोलत आहेत. रुद्रपूर पोलिस स्टेशन हद्दीतील फतेहपूर गावात या घटनेनंतर दहशतीचे वातावरण आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

मृतांमध्ये एका माजी जिल्हा पंचायत सदस्याचाही समावेश असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. एसपी संकल्प शर्मा यांनी या प्रकरणाची माहिती मिळताच गावात पीएसी तैनात केल्याचे सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

लेधाण टोला गावात दोन पक्षांमध्ये जमिनीचा वाद सुरू होता. याच गावातील अभयपुरा टोला येथील माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेमचंद यादव यांच्या कुटुंबाशी सत्य प्रकाश दुबे यांच्या कुटुंबाचे भांडण सुरू होते. जमिनीच्या वादातून दोन्ही पक्ष सतत आमनेसामने येत होते. सोमवारी सकाळी प्रेमचंद यादव यांची हत्या करण्यात आली. यानंतर काही लोकांनी सत्य प्रकाश दुबे यांच्या घरावर हल्ला केला. ते लाठ्या आणि बंदुकां घेऊन होते. सत्य प्रकाश दुबे, त्यांची पत्नी आणि घराबाहेर बसलेल्या पाच जणांची हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन मुले आणि एका महिलेचा समावेश आहे.

रुद्रपूर कोतवाली परिसरातील फतेहपूर ग्रामपंचायतीच्या लेधाण टोला येथे जमिनीच्या वादातून ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस गावात दाखल झाले. डीएम आणि एसपी घटनास्थळी पोहोचले आहेत. वातावरण शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 6 जणांच्या हत्येनंतर गावात संतापाचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच एसपी संकल्प शर्मा यांनी नजीकच्या पोलीस ठाण्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. त्यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली. डीएम अखंड प्रताप सिंहही घटनास्थळी पोहोचले.