मध्यप्रदेशमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या, पोलीस फौजफाटा घटनास्थळी रवाना

WhatsApp Group

मध्य प्रदेशातील मुरैना येथून हृदय हेलावणारी बातमी आहे. येथे 5 मे रोजी पहाटे एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या करण्यात आली. जिल्ह्यातील सिहोनिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेपा भिडोसा गावात ही घटना घडली.

जुन्या वैमनस्यातून एका बाजूने एकाच कुटुंबातील सदस्यांची गोळ्या झाडून हत्या केली. या गोळीबारामागे अनेक वर्षे जुना वाद असल्याचे सांगण्यात येत आहे.