इलेक्ट्रिक बाइक चार्ज करताना शोरूमला लागली आग…! 6 जणांचा मृत्‍यू

WhatsApp Group

सिकंदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबादला लागून असलेल्या सिकंदराबादमध्ये इलेक्ट्रिक बाइकच्या शोरूमला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दरम्यान अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. परंतु रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर अन्य काही लोक यामध्ये अडकले होते त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे सिकंदराबादमधील पासपोर्ट कार्यालयाजवळील इलेक्ट्रिक बाइक शोरूममध्ये ही आग लागली. शोरूमच्यावर लॉज आहेत, ज्यामध्ये अनेक लोक अडकले होते. या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली दरम्यान अद्यापही घटनास्थळी बचावकार्य असल्याचेही त्यांनी सांगितले.