पण सेक्स केल्यानंतर स्त्रीच्या योनीमध्ये संसर्ग होण्याचा धोका वाढतो. म्हणूनच सेक्सनंतर तुम्ही काही पावले उचलली पाहिजेत जेणेकरून पुढच्या वेळीही तुम्हाला त्याच उत्साहाने सेक्सचा आनंद घेता येईल.
1. पाण्याने वरचा भाग स्वच्छ करा
सेक्स केल्यानंतर 5 ते 10 मिनिटांनंतर, जेव्हा तुमची योनी पूर्ववत स्थितीत येऊ लागते, तेव्हा ती फक्त पाण्याने धुवा. पाणी नसल्यास, फक्त वरचा भाग स्वच्छ कापडाने पुसून टाका. खालचा भाग ओला ठेवल्याने बुरशीजन्य संसर्ग/ फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
सेक्स केल्यानंतर लगेच आंघोळ करण्याची गरज नाही. पण जर तुम्हाला आंघोळ करून स्वतःला पॅम्पर करायचे असेल तर कोमट पाण्याचा वापर करा. थंड पाण्याने चुकूनही आंघोळ करु नका कारण सेक्समुळे तुमचे शरीर गरम झालेले असते आणि थंड पाण्याने आंघोळ केल्याने स्नायू आकडण्याचा धोका असतो.
2. योनीमार्गात साबण/पाणी आदीचा वापरू करु नका
अनेकांना ही गोष्ट माहीत नाही, पण योनी ही एक अशी नळी आहे जी शरीराच्या आतल्या गर्भाशयाला जोडते. बाहेरील भागाला व्हल्वा (Vulva) म्हणतात. अनेक स्त्रिया योनीच्या आतील भागाला पाणी आणि साबणाने स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. जे योग्य नाही, यामुळे नुकसान होऊ शकते.
तुमच्या योनीसाठी तुम्हाला कोणत्याही साबणाची किंवा जेंटल वॉशची गरज नसते. योनीमध्ये चांगले बॅक्टेरियाही असतात जे तिला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवतात. साबणाने वारंवार धुण्याने योनीचे पीएच संतुलन बिघडते. यामुळे चांगले बॅक्टेरिया नष्ट होतात आणि संसर्गाचा धोका वाढतो.
3. मूत्राशय रिकामे करा / लघवी करा
सेक्सनंतर लघवी करणे खूप महत्वाचे आहे, विशेषतः मुलींसाठी. तुम्हाला लघवी करण्याची गरज वाटत नसली तरी वॉशरूममध्ये जा. याचे कारण असे की सेक्स दरम्यान गुदाशयातील बॅक्टेरिया योनी आणि मूत्रमार्गात संक्रमणास कारणीभूत ठरू शकतात. लघवी हे सर्व बॅक्टेरिया आपल्यासोबत बाहेर काढते आणि मारते.
