Black Hair Tips: पांढरे केस काळे करण्याचे 6 सर्वात सोपे घरगुती उपाय

0
WhatsApp Group

केसांचे सफेद होणे ही आता सर्वात मोठी समस्या होत चालली आहे. हल्ली तर वयाच्या 20-25 व्या वर्षानंतरही केस पांढरे होताना दिसून येतात. चुकीच्या खाण्याच्या पद्धती आणि राहण्याच्या सवयी यामुळे अनेकदा ही समस्या उद्भवते. अनेकदा यामुळे केस काळे करण्याचा ट्रेंड फारच कमी वयात सुरू झाला आहे. मात्र नैसर्गिक पद्धतीने केस काळे राहिले तर प्रत्येकाला हवे असते.

बाजारात अनेक उत्पादने मिळतात ज्यामुळे केस काळे करता येतात. मात्र यातील रसायनांमुळे केस खराब होतात आणि निस्तेज होतात. याशिवाय केसगळती आणि केस तुटणे यासारख्या समस्याही निर्माण होतात. यासाठी केस घरीच काळे करण्यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय सांगितले आहेत. 

कोरफड – पांढरे केस मुळापासून काळे करण्यासाठी कोरफड एक उत्तम उपाय आहे. केसांना कोरफडीचा गर लावल्यानेही केस गळणे आणि पांढरे होणे बंद होतात. यासाठी कोरफडीच्या गरामध्ये लिंबाचा रस टाकून पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट केसांना लावा. काही दिवस हा उपाय करून बघा.

हेही वाचा – सफरचंद खाण्याचे ‘हे’ 9 फायदे जाणून घ्या

कांदे – कांदा फक्त स्वयंपाकासाठी नाही तर तुमचे केस काळे करण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतो. काही दिवस आंघोळ करण्याआधी केसांना कांद्याची पेस्ट किंवा रस लावा. याने पांढरे केस काळे होऊ लागतील. तसेच केसांना चमकही येईल.

आवळा – आवळा आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर असतो आणि त्याचे अनेक आयुर्वेदिक फायदे देखील आहेत. आवळ्याचं नियमीत सेवन केल्याने तुमची पांढऱ्या केसांची समस्याही दूर होऊ शकते. यासाठी आवळा केवळ खाऊ नका तर हा मेहंदीमध्ये मिश्रित करूनही केसांना लावा. तसेच आवळा बारीक करुन गरम खोबऱ्याच्या तेलात मिश्रित करा. हे तेल रोज केसांना लावा, यानेही समस्या दूर होईल.

हेही वाचा – सकाळी उठल्यावर करा ‘हे’ काम, शारिरीक समस्या नक्कीच दूर होतील

कढीपत्ता – पांढरे होत असलेल्या केसांसाठी कडीपत्ता फार चांगला मानला जातो. आंघोळीच्या पाण्यात कढीपत्त्याची काही पाने टाका आणि एक तासांनी त्या पाण्याने केस धुवावे किंवा कढीपत्त्याची पाने बारीक करुन गरम खोबऱ्याच्या तेलात टाका.कडीपत्त्याची हे तेल केसांवर लावल्याने अनेक फायदे मिळतात.

काळे मिरे – काळे मिरे हा देखील जेवणाची चव वाढवणारा पदार्थ आहे. यासाठी काळे मिरे पाण्यात उकडून घ्या आणि त्या पाण्याने केस धुवा. काही वेळा हा उपाय केल्यास पांढरे केस काळे होतील.

भृंगराज आणि अश्वगंधा – भृंगराज आणि अश्वगंधाची मूळं केसांसाठी वरदान मानले जातात. याची पेस्ट तयार करुन त्यात खोबऱ्याचं तेल टाका. ही पेस्ट काही तासांसाठी केसांच्या मुळात लावा. नंतर केस कोमट पाण्याने चांगले स्वच्छ करुन घ्यावे. यामुळे केस काळे होण्यास मदत होईल.

हेही वाचा – सकाळी की संध्याकाळी? कोणत्या वेळी व्यायाम करणे अधिक फायदेशीर ठरेल, जाणून घ्या