राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.
लाडकी बहिण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या सशक्तीकरणासाठी सुरु केली आहे. आता दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने या महिलांसाठी खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. सरकारकडून सांगण्यात आलंय की, दिवाळीला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळणार. याशिवाय काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत. या दिवाळी बोनसबाबात जाणून घेऊयात संपूर्ण माहिती…
PM Kisan Yojana : किसान सन्मान निधी योजना, लाभ, पात्रता, अर्ज प्रक्रिया कसा करावा जाणून घ्या
लाडकी बहिण योजना काय आहे ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे? ते पाहूया महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील मुली व महिलांना दरमहा 1500 रू दिले जाणार आहेत. तर ही मदत महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी दिले जाणार आहे. तर महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण” योजना सुरू करण्यात आली आहे.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिवाळीसाठी एक खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. सरकारने म्हटलंय की, दिवाळीच्या सणानिमित्त योजनेच्या सर्व पात्र महिलांना 3000 रुपयांचं बोनस दिलं जाईल. ही रक्कम महिन्याला नियमित मिळणारे पैसे वगळून दिली जाईल. काही निवडक महिलांना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही दिली जाईल. याप्रकारे काही महिलांना एकूण 5500 (3000+2500) रुपयांचा लाभ मिळणार आहे. दिवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच मिळणार आहे. यासाठी या अटी पूर्ण कराव्या लागतील.
1) महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
2) त्यांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.
3) त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
ऑफलाईन अर्ज कसा करावा?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे पण तुमच्या जवळ मोबाईल फोन नाही किंवा तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यासंदर्भात तुम्ही खालील दिलेल्या प्रक्रियेनुसार तुम्ही स्वतःचा Offline अर्ज सादर करू शकतात, त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे
लाडकी बहीण योजनेचा ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला योजनेचा अर्ज फॉर्म झेरॉक्स सेंटरवरून घ्यावा लागेल.
त्यानंतर योजनेसाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे तयार करून घ्यावे
आता तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत/सेतू केंद्र/अंगणवाडी केंद्र/महिला व बालकल्याण विभाग या कोणत्याही एका ठिकाणी जाऊन या योजनेसाठी तुम्ही ऑफलाइन अर्ज सादर करू शकता
वरील कार्यालयाच्या अधिकाऱ्याद्वारा आपले अर्ज योजनेच्या अधिकृत पोर्टल मार्फत ऑनलाईन केले जाईल
तुम्ही काही दिवसानंतर कार्यालयाला त्यांना भेट देऊन अर्जाची पावती घेऊ शकता
अशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज सादर करू शकता.