शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसलेल्या भावी शिक्षकांसाठी एक खुशखबर आहे. राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.
पहिल्या टप्प्यात 30 हजार आणि दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती होणार आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे शिक्षक भरती नियोजनाचे काम ठप्प झाले होते. आता उच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवली आहे, त्यामुळे आज शिक्षक भरतीचे परिपत्रक (जीआर) काढण्यात येणार असल्याचे केसकर यांनी म्हटले आहे.