बिहारमधील औरंगाबादमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटात 50 जण जखमी

WhatsApp Group

शनिवार 29 ऑक्टोबर 2022 रोजी बिहारच्या औरंगाबादमधील शहागंज तेली भागात एका जनरल स्टोअरला लागलेल्या आगीत गॅस सिलिंडर आणि रेफ्रिजरेटरचा स्फोट होऊन किमान 50 जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पहाटे 3.30 च्या सुमारास घडली यात 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याच्या प्रयत्न केला मात्र यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दुकानाचे मालक अनिल कुमार यांनी सांगितले की, त्यांची पत्नी छठ पूजेसाठी जेवण बनवत असताना ही घटना घडली. ते म्हणाले, “छट पूजा होती ज्यासाठी माझी पत्नी जेवण बनवत होती आणि तेव्हाच आम्हाला कळले की दुकानाला आग लागली आणि सर्वजण इकडे-तिकडे धावू लागले. यादरम्यान सिलिंडरचा स्फोट झाला आणि माझ्या मुलासह आम्ही सर्वजण जखमी झालो.