
चित्रपट निर्माता करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेल्यांमध्ये 50-55 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. करणच्या वाढदिवसानिमित्त ही पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीमध्ये शाहरुख खान, करीना कपूर खान आणि हृतिक रोशन, आमिर खान यांसारखे बॉलिवूडचे अनेक लोक होते.
करण जोहरच्या पार्टीला आलेल्या 50-55 पाहुण्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. परंतु हे पाहुणे त्यांची माहिती द्यायला तयार नाहीत. कालच अभिनेता कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. परंतू कार्तिक करण जोहरच्या पार्टीत सहभागी झाला नव्हता.पण त्याची सहकलाकार कियारा अडवाणी (Kiara Advani) पार्टीला गेली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री कियारा अडवाणीही कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. परंतू तिने आतापर्यंत कोणतीही अपडेट तिच्या चाहत्यांना दिलेली नाही. कार्तिक आणि कियारा ‘भुल भुलैया 2’ (BhoolBhulaiya2) सिनेमाच्या प्रमोशनसाठी एकत्र फिरत होते. तेव्हाच कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं जात आहे.